महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी राकेश सोमानी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी इंजि. राकेश सोमानी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

इंजि. राकेश सोमानी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सामाजिक, राजकीय तसेच व्यापारी क्षेत्रात ते सक्रिय आहेत. व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या संबंधित प्रशासनापर्यंत प्रभावीपणे मांडणे आणि व्यापारी वर्गाच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

बल्लारपूर शहरातील व्यापारी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी व्यापारी मंडळाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे सोमानी यांनी सांगितले. सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच व्यापारी वर्गाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

इंजि. राकेश सोमानी यांच्या निवडीबद्दल व्यापारी बांधवांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos