महत्वाच्या बातम्या

 टॉवर टेकडी जंगलात  जुगार अड्ड्यावर रामनगर  पोलिसांचा छापा : २० जणांविरुद्ध गुन्हा ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : टॉवर टेकडी परिसरातील जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी छापा टाकून २० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. कारवाईत जुगाराच्या साहित्यासह एकूण ४० लाख ४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांना टॉवर टेकडी परिसरातील जंगलात ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी वेशांतर करून जंगलाला चारही बाजूंनी वेढा घातला. रात्री १०.३६ वाजता अचानक छापा टाकण्यात आला. काही जण पोलिसांच्या हाती लागले, तर काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या प्रकरणी आरोपी  इम्रान खान रशीद खान ३३ वर्षे रा. बाबुपेठ, फुले चौक, अनिल पंढरीनाथ ढोंगडे ३९ वर्षे रा. जुनोना चौक, शांतीनगर, मदरशामागे, सागर मुरली नागरे ३२ वर्षे रा. रयतवारी कॉलरी, तेलगू शाळेजवळ, मन्सुर असरार अहमद ३२ वर्षे रा. रयतवारी कॉलरी, माता मंदिराजवळ, अर्शद चांद शेख ३३ वर्षे  रा. बाबुपेठ, डीएड कॉलेजजवळ, अमोल निलकंठ तडस ३८ वर्षे रा. जुनोना चौक, बाबुपेठ, चंद्रपूर, सुरेश पुनराज वावरे ५६ वर्षे रा. बाबुपेठ, मोटघरे लेआउट गुड्डू अंडेवाला रा. बल्लारपूर, हरी पुजारी  रा. बल्लारपूर. अमित माखन गुप्ता रा. महाकाली कॉलरी, जावेद शेख रा. बल्लारपूर, भीमराव माउलीकर रा. फुले चौक, बाबुपेठ, सुरज उर्फ मुरा रा. लालपेठ, मायनस क्वार्टर, वतन कांबळे रा. आंबेडकर चौक, बाबुपेठ, सादिक ईराणी रा. चंद्रपूर. राहुल कोमटी रा. जंगम वस्ती, लालपेठ, येलन्ना मामीडवार रा. लालपेठ कॉलरी क्रमांक ३, राज बब्बर  रा. एरिया हॉस्पिटलजवळ, लालपेठ, मुन्ना माधव मिश्रा रा. लालपेठ, धनराज सावरकर रा. अंचलेश्वर गेट याशिवाय घटनास्थळावरून पसार झालेल्या दोन ते तीन जणांची ओळख व पूर्ण पत्ता अद्याप निष्पन्न झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल असा एकूण ४० लाख ४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलिस निरीक्षक हनुमान उगले, पोहवा अमोल गिरडकर, पोहवा विनोद यादव, पोहवा मिलींद दोडके, पोहवा आनंद खरात, पोअं. राजु चिताडे, पोअं संदेश चुनारकर, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, शंकर भोयर, कन्हैया पवार, संदीप भोयर, अमरदीप वावरे, सुमेध मानकर, रविंद्र बाभीटकर, चापोअं सुनिल गायके, चापोहवा प्रदीप कुळमेथे, पोहवा शैलेंद्र सेलोटे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos