रत्नापूर जि.प. माध्यमिक शाळेत ३८४ विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण


- खासदार डॉ. नामदेव किरसान व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शनिवार, ८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खासदार डॉ. नामदेव किरसान, चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ३८४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन नोटबुकचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नोटबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत लोधे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदेवाही होते. प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराजी मेश्राम, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ तथा माजी सरपंच, ग्रामपंचायत रत्नापूर, तसेच उद्धवरावजी तोंडफोडे, माजी उपसरपंच उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंगेश मेश्राम, संदीप रेपकवार, मंगेश गभने, प्रकाश उरकुडे, वासुदेव दडमल, अंकुश गहाणे, सुरेश लोधे, घनश्याम बोरकर, मुख्याध्यापक दिनकर गायकवाड, नंदू बोरकर, सोमेश्वर आत्राम, विकास राजूरकर, रोशन रावणे, वैशाली कोवले, जीवन राऊत, तुळशीराम चाचेरकर, अंकुश गजबे, मंगेश बन्सोड, शितल कापगते यांच्यासह शिक्षक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जीवन राऊत यांनी केले. मुख्याध्यापक दिनकर गायकवाड यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर सोमेश्वर आत्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. विद्यार्थ्यांना नोटबुक उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी खासदार डॉ. नामदेव किरसान आणि आमदार विजय वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
News - Chandrapur




Petrol Price




