महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लगतच्या नेरी-मिरापूर येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. बंडू सीताराम राऊत ५६ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. राऊत यांच्या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. त्या आगीत एक बैल मृत झाला होता. गोठ्यामध्ये असलेले शेतीपयोगी साहित्य खाक झाले होते.

त्याचप्रमाणे यांच्यावर बँकेचे व हात उसने काही प्रमाणात कर्ज होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. या तणावात बंडू राउत यांनी मंगळवारी दुपारी शेतात कोणीही नसताना विहिरीत उडी घेऊन स्वतःची जीतनयात्रा संपतली पोलिसांनी गाठले घटनास्थळ, दुसरेच निघाले पोलिस स्टेशन काही दिवसांपूर्वी गोठ्याला आग लागली होती. त्यात त्यांचा एक बैल मृत पावला होता. 

मृत शेतकऱ्याच्या मागे दोन मुले व आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूरच्या ठाणेदार संगीता हेलोंडे, जमादार अतुल लभाने यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर घटनास्थळ सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे कळले. त्यानंतर सेवाग्राम पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. 

सेवाग्राम येथील पीएसआय मारुती काटकर, जमादार आशिष डफ यांनी शेतात जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सेवाग्राम पोलिस करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos