चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कंप्यूटर डीलर असोसिएशनच्या (सीडीसीडीए) नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कंप्यूटर डीलर असोसिएशनचा (सीडीसीडीए) वार्षिक पदग्रहण सोहळा आज, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील यंग रेस्टॉरंट येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व प्रमुख सदस्य, पदाधिकारी आणि संगणक क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. चंद्रपुरातील कॉम्प्युटर व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे, डिजिटल क्षेत्रातील नवीन आव्हानांना सामोरे जाणे आणि संघटनेची ताकद वाढवणे यावर या वेळी भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे कौतुक केले असून आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकारणी -
पंकज झोडे- अध्यक्ष
उज्वल तिवारी- उपाधक्ष
संजय कावलकर- सचिव
सागर रसपायले - सहसचिव
वैभव थोटे- कोषाधक्ष
कुंदन सुंकुरवर- सदस्य
मुकेश मस्के- सदस्य
अतुल आकनूरवर- सदस्य
सुखदेव मोहितकर - सदस्य
मंगेश कामडी - सदस्य
अतुल गुंडावार - सदस्य
News - Chandrapur




Petrol Price




