झुडपी जंगलात सुरू होता जुगार : दुर्गापूर पोलिसांच्या छाप्यात चार जण ताब्यात, दोन फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वार्ड क्रमांक ३ येथील स्मशानभूमीमागील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान दुर्गापूर पोलीस स्टेशन चे पथक गस्त घालत असताना मुखबिरामार्फत वार्ड क्रमांक ३ येथील स्मशानभूमीलगतच्या झुडपी जंगलात काही इसम पैशांची बाजी लावून ५२ तास पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या घटनास्थळी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान चार जण जुगार खेळताना आढळून आले, तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. फरार आरोपींपैकी एकाने आपली दुचाकी सोडून पळ काढला.
या कारवाईत आकाश देवानंद कोडापे (२७), दीपक चंदू रणवीर (२४), नितीक नरेंद्र कस्तुरवार (२५) आणि शादाब शबीर सैफी (२८) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर प्रदीप लक्ष्मण पेगडपल्लीवार (४९) आणि ईश्वर चौधरी (३०) हे आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या डावावरील १,५०० रुपये, आरोपींकडून मिळून १,९०० रुपये रोख रक्कम, ५२ पत्त्यांचा संच तसेच फरार आरोपी ईश्वर चौधरी याची सुमारे ४० हजार रुपये किंमतीची होंडा फॅशन प्रो दुचाकी जप्त केली. एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष शेगावकर यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे, पोहवा राजु गोखरे, पोअं मंगेश शेंडे, संदीप जाधव, रुपेश सावे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




