महत्वाच्या बातम्या

 वर्धेतील सहा केंद्रावर २१ जुन रोजी नीट परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम १६३ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा शहरातील शाळा व महाविद्यालयातील ६ परीक्षा  केंद्रावर २१ जुन रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचे (NEET-UG) आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

सदर आदेश २१ जुन रोजी सकाळी ११ वाजता पासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात लागू राहणार आहे. या दरम्यान परीक्षा केंद्राभोवती १०० मीटर परिसरात दोन अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि १०० मीटर परिसरातील सर्व झेरॅाक्स, मोबाईल, एसटीडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट इत्यांदी ईलेक्ट्रॉनिक उपकरणे व ईलेक्ट्रॉनिक्स सुविधांच्या वापरावर व सुरु ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. सदर आदेश परिक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी व परिक्षेशी निगडीत अधिकारी, कर्मचारी आणि परिक्षार्थींना लागू असणार नाही ,असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos