महत्वाच्या बातम्या

 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) प्रमाणे अधिसुचना जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात१७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव साजरी करण्यात येणार आहे. सदर उत्सव दरम्यान जिल्हयात विविध मंडळाकडून मिरवणूकीचे आयोजन केले जाणार आहे. सदर मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठया प्रमाणात करीत आहेत.

कोल्हापूर जिल्हयातील उचगाव परिसरातील मणेरगळा येथे श्रीगणेष मुर्ती हे आगमन मिरवणूकीवेळी मिरवणूक बघण्याकरिता आलेल्या भाविकांना लेझर लाईट डोळयावर पडल्याने सदर व्यक्तींना डोळयाचा पडदा तसेच बुबुळाला ईजा झाल्याचे निर्दश्‍नास आले आहे. तसेच सन २०२३ मध्ये यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथे ईद-ए-मिलाद मिरवणूकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या नगर परिषद व्यापारी संकुलाच्या ईमारतीच्या मध्यभागी शिवराजमुद्रा व शिवाजी महाराज यांचे अर्ध पुतळयावर डीजे वरुन लेझरच्या सहाय्याने मिनार व मस्जिद चे चित्र तयार करुन हिंदु धर्माचे धार्मीक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होईल अशी क्लिप सोश्‍ल मिडीयावर वायरल झाल्याने शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन उमरखेड येथे आरोपींतावर विविधि कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गडचिरोली जिल्हयात १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ मोहरम उत्सव मिरवणूकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर मिरवणूकांमध्ये लेझर लाईटचा वापर हे मोठया प्रमाणात केल्या जातो. त्यामुळे मिरवणूकांमध्ये लेझर लाईट वापरात प्रतिबंध करणे आवश्यक आहे. याबाबत भारतीय नागरी सुरक्षा संहिंता २०२३ चे कलम १६३(१) मध्ये जेथे जिल्हा दंडाधिकारी यांच्या किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या मते या कलमाखाली कार्यवाही करण्यास पुरेसे कारण असेल आणि तात्काळ प्रतिबंध करणे किंवा सत्वर उपाययोजना ईष्ट असेल त्याप्रकरणी, एखादया व्यक्तीला विवक्षीत कृती करण्यापासुन परावृत्त राहण्याचा अथवा मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका, जनतेमध्ये गोंधळ निर्माण होणे, दंगल भांडण उत्पन्न होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवण्याचा संभव आहे. असे दंडाधिकारी यांना वाटले तर, असा दंडाधिकारी त्या प्रकरणाच्या तथ्यांचे निवेदन अर्तभुत असलेला एक लेखी आदेश काढुन निर्देश देऊ शकेल. 

अशी तरतुद नमुद आहे. गडचिरोली जिल्हयामध्ये १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव निमित्ताने मिरवणूकांचे आयोजन केले जाणार आहे. सदर मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठया प्रमाणावर करीत आहेत. त्यामुळे मिरवणूकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) मध्ये नमुद तरतुदीच्या अनुषंगाने सदरचे कलम लागु करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी, एम रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गडचिरोली भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये, मला प्रदान असलेल्या अधिकारास अनुसरुन असा आदेश देतो की, १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा वापरास प्रतिबंधक करणे आवश्यक असल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम १६३(१) मध्ये नमुद तरतुदीच्या अनुषंगाने सदरचे कलम लागू करणे आवश्यक आहे.

ज्याअर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ गृह विभाग भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ क्रमांक पीआरओ-0624/प्रक्र.३१/विशा-२ तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३(२०२३ चा ४६) याच्या कलम १५ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन कलम १६३(१) अन्वये १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव मिरवणूकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंधक करण्यात येत आहे. 

वरील बाबीस या आदेशाद्वारे बंदी घालण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील हा आदेश पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम रमेश यांच्या सही शिक्यानिशी १५ जून २०२६ रोजी दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos