रेगडीत पोलिसांची धडक कारवाई : १.८५ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / घोट : रेगडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ३० मेच्या रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत एक लाख ८५ हजार ६०० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई रेगडी येथील एका घरात दारू विक्रीसाठी साठवले असल्याच्या माहितीवरून करण्यात आली.
रेगडी ठाण्याचे उपनिरीक्षक कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत मुख्य संशयित नितीन मंडल अद्याप फरार आहे.
कारवाईत उपनिरीक्षक माधुरी शेलार, हवालदार शेवंता सरवर, अंमलदार संदीप खेडकर, प्रेम बोडावर, संदेश मडावी, सुनील मडावी, संजय पाल, तसेच एलसीबीचे प्रेमानंद नंदेश्वर, निशिकांत अलोणे, राजकुमार खोब्रागडे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी सांगितले की, या कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रीवर कडक नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




