महत्वाच्या बातम्या

 अहेरी नगरपंचात क्षेत्रातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता आखीव पत्रिका द्या 


- नगरसेवक प्रशांत गोडशेलवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : नगर पंचायत अहेरी अंतर्गत अहेरी नागरपंचायत क्षेत्रातील गृहकर धारक नागरिक सन १९४० चा पूर्वीपासून वास्तव्य करीत आहेत.
सदर गावातील नागरिकांना अजपावेतो आखिव पत्रिका देण्यात आली नाही. त्यामुळे सदर गावातील नागरिक अहेरी नागरपंचायत झाल्यापासून कोणत्याही योजनेचे लाख घेता आले नाही. 

सदर गावातील नागरिक प्रधानमंत्री दिवस योजनेकरिता अर्ज केले असता सदर अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत. परंतु ग्रामपंचायत असताना गावातील नागरिकांना घरकुल  लाभ मिळालेला आहे. त्याकरिता गावातील नागरिकांना आखिव पत्रिका मंजूर करून देण्यात यावी, जेणेकरून गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. तसेच सदर गावातील नागरिक हे नगर पंचायत मध्ये समाविष्ट झाल्यापासून एकूण ९ वर्ष पूर्ण झाले आहे. तेव्हापासून गावातील नागरिकांनी शासना अंतर्गत कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग, पंचायत आदिवासी विभाग सिंचाई विभाग, असे अनेक विभागातील शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता आला नाही. या योजनांपासून नागरिकांना वंचित राहावे लागले. 

त्याकरिता सदर गावातील नागरिकांच्या जमिनीची मौका चौकशी करून आखिव पत्रिकेत नोंद करण्यात यावे, व आखिव पत्रिका वाटप करण्यात यावी.अश्या  मागणीचा निवेदन नगरसेवक प्रशांत गोडशेलवार  यांच्या नेतृत्वाखाली विनोद रामटेके, कुमार गुरनुले, महेश गेडाम यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos