बल्लारपूरात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी/बल्लारपूर :कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह शुक्रवार, दि. १५ मे रोजी उत्साहात पार पडला. मेळाव्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
या रोजगार मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर,प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा.डॉ. स्वप्नील बोबडे, स्वप्नील गावंडे, रहमान, सागर बर्वे, स्नेहल डोपेकर तसेच विनायक रुक्तान यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात विविध क्षेत्रांतील कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर, प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय, व्ही.आर. एंटरप्राइसेस बल्लारपूर, ओक्सबलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर यांचा समावेश होता.
या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ४० पदांसाठी ५७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासाबाबत माहिती देण्याचा उद्देश या मेळाव्यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून ०७१७२-२५२२९५ या दूरध्वनी क्रमांकावरही माहिती उपलब्ध आहे.
News - Chandrapur




Petrol Price




