नगराध्यक्षा प्रणोती निबोरकर यांची पाणीटंचाईवर तातडीची मागणी : गोसेखुर्द धरणाचे पाणी दोन दिवसांत सोडण्याचे प्रशासनाचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रणोती निबोरकर यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना नियमित, पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली.
बैठकीत गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत तात्काळ सोडावे, जेणेकरून शहरातील जलसंकट कमी होईल, अशी मागणी करण्यात आली. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, दोन दिवसांच्या आत गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्रशासनाने शहरातील नागरिकांना दिलासा मिळावा आणि आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ नये, यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले. नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या सकारात्मक पावल्यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




