गॅस एजन्सीची धडक तपासणी डिलिव्हरी बॉईज आणि वितरण वाहनांसाठी कडक नियमावली लागू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, ग्राहकांची फसवणूक रोखणे आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करणे या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये नागपूर ग्रामीण तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका स्तरावर तहसीलदार यांचे नेतृत्वाखालील विशेष पुरवठा पथकाने तालुक्यातील विविध गॅस एजन्सीज, गोदामांची (गोडाऊन) आणि गॅस वितरण करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी मोहीम सुरु केली आहे. गॅस सिलिंडरच्या वितरणातील त्रुटी, अनधिकृत वापर आणि सुरक्षेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
गॅस एजन्सीमधील सर्व डिलिव्हरी बॉईजकडे एजन्सीचे अधिकृत ओळखपत्र (ID Card) आणि सुरक्षा गणवेश (Uniform) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनावर गॅस एजन्सीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहिलेले असावे. गॅस वितरण वाहनावर साऊंड सिस्टीमद्वारे भाई आया रे गॅस सिलेंडर हे सुरक्षा गीत अनिवार्य केले असुन याद्वारे गॅस वाहन आल्याची माहिती मिळून नागरिक सतर्क होतील.
प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे प्रमाणित डिजिटल पोर्टेबल वजन काटा असणे बंधनकारक असून, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्यासमोरच सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक आहे. गोदाम सुरक्षा व साठा तपासणीः गॅस गोदामांमध्ये आवश्यक सुरक्षा मानके, अग्निशामक यंत्रणा आणि प्रत्यक्ष उपलब्ध सिलिंडर साठा याची नोंदवहीनुसार पडताळणी केली जात आहे.
News - Nagpur




Petrol Price




