महत्वाच्या बातम्या

 मग्रारोहयो मधील कामांमध्ये दोषी आढळल्यास निलंबनाची कार्यवाही 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस करून तसेच काम न करता पैशाची उचल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, याबाबत तक्रार पत्र निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे पत्र ०८ डिसेंबर २०२२ अन्वये प्राप्त झाले होते.
त्याअनुषंगाने या कार्यालयाचे २२ डिसेंबर २०२२ आदेशान्वये रविंद्र एस. कणसे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने २४ फेब्रुवारी २०२३ अन्वये चौकशी अहवाल सादर केला होता.


सदर चौकशी अहवालामध्ये भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) व ६ ग्रामसेवक इत्यादी प्रथम दर्शनी दोषी आढळून आल्याने दोन ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून ६ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांच्यावर विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच गट विकास अधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे जोडपत्र १ ते ४ मध्ये सादर करण्यात आलेला आहे. 


तांत्रीक सहायक (TPO) यांना काढून टाकण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली. तसेच अहेरी येथील एक ग्रामसेवक प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.


निलंबित ग्रामसेवक : विशाल चिडे ग्रा. से. ग्रा. पं. मलेराजाराम पं. समिती भामरागड, सुनील जटीवार, ग्रा.से. पं. बोटनफुंडी, पं.स. भामरागड, लोमेश सिडाम  ग्रा.से. उमानूर पं. स. अहेरी असे आहेत. पंचायत समिती मुलचेरा व अहेरी मधील तक्रारी संबंधाने तांत्रीक बाबीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांच्याकडून पुरक चौकशी करण्यात येणार असून चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.





  Print






News - Gadchiroli




Related Photos