महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही खरेदी- विक्री संस्थेत धान्य खरेदीचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही खरेदी विक्री संस्थेमध्ये चालू हंगामातील धान्य खरेदीचा अधिकृत शुभारंभ मंगळवार १९ मे रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मंगेश गभणे यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद हेमके, संचालक अरविंद राऊत, दामु नन्नावार आणि संजय पुपरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते.  तसेच संस्थेचे सचिव जयंद्र सोनवणे, कर्मचारी उमेश लोखंडे व परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव या कार्यक्रमाला हजर होते.शासकीय दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले धान संस्थेच्या केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन अध्यक्ष मंगेश गभणे व प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos