कोरची पोलिसांनी १८ लाख २५ हजार रुपयांचा जप्त दारू व साहित्य केला नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / कोरची : कोरची पोलिसांनी विविध २५ गुन्ह्यांमधील तब्बल १८ लाख २५ हजार रुपयांचा जप्त मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट केला. ही कारवाई १५ एप्रिल रोजी पार पडली.
जप्त मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, बिअर कॅन तसेच इतर साहित्याचा समावेश होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक चंदन भगत यांच्या उपस्थितीत हा साठा जेसीबीच्या साहाय्याने चिरडून तसेच जाळून नष्ट करण्यात आला.
या कारवाईनंतर पंचनामा करण्यात आला, ज्यामध्ये कोरची ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि अंमलदार उपस्थित होते.
या कारवाईमुळे परिसरातील दारू व गैरकायदेशीर साहित्यावरील नियंत्रण अधिक सक्षम झाले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




