भंडारा रेल्वे स्थानकावर भीषण अपघात : प्रवाशाचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : प्रवाशांच्या सुरक्षेचे मोठमोठे दावे करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आला आहे. बुधवारी, १ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकावर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला आणि तो थेट गाडीखाली गेला. या भीषण अपघातात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्ष पाहणाऱ्या प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली; परंतु मदत पोहोचण्याआधीच उशीर झाला. मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार तो नागपूरचा रहिवासी असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
या थरारक घटनेनंतर प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनावरील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रवाशांनी सवाल उपस्थित केला आहे की, पुरेसे पोलिस बळ किंवा सुरक्षा रक्षक स्थानकावर का तैनात केलेले नाहीत? अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
रेल्वे पोलिस अपघाताची सखोल चौकशी करत असून मृतक प्रवाश्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
News - Bhandara




Petrol Price




