महाराष्ट्रात एलपीजी तुटवडा : सरकारने तात्पुरते केरोसीन वितरणास मंजुरी दिली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात एलपीजी (गॅस) तुटवड्यामुळे महाराष्ट्र सरकारने तात्पुरते केरोसीन वितरणास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी ३ हजार ७४४ किलोलीटर (३७.४४ लाख लिटर) केरोसीन मंजूर करण्यात आले असून, प्रत्येक कुटुंबाला ३ लिटरपर्यंत केरोसीन देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मार्च २०२६ पासून या वितरणाची अंमलबजावणी होणार आहे.
पूर्वी, नागपूर खंडपीठाने २०१६ मध्ये एलपीजी कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसीन देऊ नये असा आदेश दिला होता. त्यामुळे वितरण अत्यंत मर्यादित झाले होते. मात्र, एलपीजी तुटवडा निर्माण झाल्यामुळे सरकारने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे.
कोणाला लाभ मिळणार? -
अंत्योदय आणि प्राधान्य शिधापत्रिका धारकांना प्रथम प्राधान्य
उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारकांनाही लाभ
शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही ग्रामपंचायत दाखल्यावर केरोसीन
स्थलांतरित मजूर देखील पात्र
वितरणाची अट व कालावधी -
प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर केरोसीन
४५ दिवसांत संपूर्ण उचल बंधनकारक; न उचललेला साठा पुढे नेला जाणार नाही
केरोसीनचे दर अद्याप निश्चित नाहीत; वाहतूक दर आणि विक्रेत्यांच्या कमिशनबाबत निर्णय प्रलंबित
तेल कंपन्यांसाठी निर्देश -
सरकारने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमला कठोर सूचना दिल्या आहेत:
पहिल्या १५ दिवसांत ८५% साठा वितरित करणे
उर्वरित साठा पुढील १५ दिवसांत वितरित करणे
जिल्हानिहाय वाटप काटेकोर पाळणे, विलंब टाळणे
जिल्हानिहाय वाटप -
ग्रामीण भागाला प्राधान्य देत केरोसीन वाटप करण्यात आले आहे:
नाशिक – २२८ किलो लीटर
पुणे ग्रामीण – २०४ किलो लीटर
छत्रपती संभाजी नगर – २१६ किलो लीटर
शहरी भागातील जिल्ह्यांना (मुंबई, पुणे शहर, नागपूर शहर) साठा दिलेला नाही.
News - Rajy




Petrol Price




