महत्वाच्या बातम्या

 कृष्णापूर : पिडित बालीकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी विकास सुरपाम यांस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ ५ हजार द्रव्य दंडाची शिक्षा


विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : केळापूर तालुक्यातील मौजा कृष्णापूर येथे एका पिडीतेवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत एम. देशमुख यांनी आरोपी विकास आनंदराव सुरपाम यांस १० वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार  रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी शासनाची बाजू मांडली. 

केळापूर तालुक्यातील मौजा कृष्णापूर (जि. यवतमाळ) येथे ०८ डिसेंबर २०१५ च्या ५ ते ६ दिवसांपुर्वी घटना घडली होती. आरोपी विकास आनंद सुरपाम याचे पिडितेवर त्याचे प्रेम आहे, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी पासुन पिडीता ४ महिण्याची गर्भवती राहिली होती. पिडीतेनी आरोपीला लग्न करण्यास विनंती केली. परंतु आरोपीने पिडीतेसोबत विवाह करण्यास नकार देऊन धमकी दिली.

अखेर पिडीतेने पांढरकवडा पोलीस स्टेशनल स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला. सदर रिपोर्ट वरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपराध क्रंमाक ३३५/२०१५ अन्वये आरोपी विकास सुरपाम विरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (एन), ५०६, ४१७ सहकलम ६ बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक संजीव खंदारे यांनी केला. तसेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

अभियोग पक्षाकडून सहाय्यक सहकारी  अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले.  विशेष सत्र न्यायालयाने पिडिता, वैद्यकीय अधिकारी इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राहय धरुन भादंवि कलम कलम ३७६ (२) (एन), ५०६, ४ सहकलम ६ बाल लैंगिक संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत आरोपी विकास सुरपाम यांस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व रूपये ५ हजार  द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास आरोपीला ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवी ४१७ मध्ये १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १ हजार रु. दंड, दंड न भरल्यास आणखी १५ दिवसाची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. तसेच भांदविचे कलम ५०६ भांदवी मध्ये १ वर्षे सश्रम कारवास व ५००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवसाची अतिरिक्त सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शासनातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी काम पाहिले.





  Print






News - Rajy




Related Photos