गडचिरोली येथे धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे, झाडिया समाजाच्या नागरिकांना शासनाने दिलेले जातीचे दाखले रद्द करावे. मेंढपाळांना वनक्षेत्रात मेंढ्या चराईसाठी परवानगी द्यावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राज्य सचिव हरीश खुजे, नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार, डॉ. नारायण कर्रेवार, विजय कोरेवार आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दोन्ही जिल्ह्यातील हजारो महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर डॉ. विकास महात्मे व अन्य मंडळींनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
News - Gadchiroli