शालांत पूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरीता राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. यात १) अंध (दृष्टीबाधित), अंशत: अंध, अस्तीव्यंग, रोगमुक्त, कुष्ठरुग्ण (इयत्ता १ ते ४ करीता दरमहा १०० रुपये तर इयत्ता ५ ते ७ करीता १५० रुपये) २) कर्णबधीर विद्यार्थ्यासाठी (इयत्ता १ ते ४ करीता दरमहा १०० रुपये तर इयत्ता ५ ते ७ करीता १५० रुपये) ३) १८ वर्षापर्यंतच्या मतीमंद व मानसिक आजार (बौधिक अक्षम) दिव्यांगासाठी दरमहा १५० रुपये, कर्णबधीर - इयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांकरीता दरमहा २०० रुपये.
पात्रता निकष -
सदर योजना दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील, अर्जदार/लाभार्थ्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे, सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये १५०००/- इतकी राहील, शासकीय प्रशिक्षण संस्था/शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजक्ता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल, प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल, लाभार्थ्यांना मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री साठीच असेल.
आवश्यक कागदपत्रे -
आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) दिव्यांग प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, औद्योगिक प्रशिक्षण प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, साधनसामुग्री आवश्यक साहित्याची यादी, परिशिष्ट-अ, परिशिष्ट ब, घोषणा पत्र, आधारसंलग्न बँक खात्याचा तपशील.
अनुदेय अर्थसहाय्य -
१) अर्थसहाय्याची कमाल मर्यादा १५ हजार रुपये इतकी राहील.२) पात्र लाभार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा करण्यात येईल. ३) लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी अर्थसहाय्य घेतले आहे, तो व्यवसाय सुरु न केल्यास मंजूर अर्थसहाय्य वसूल करण्यात येईल. सदर योजनेचा जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.




Petrol Price




