दिल्लीत ६ दहशतवाद्यांना अटक


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्लीमध्ये मोठी खळबळजनक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 जणांना अटक केली आहे. यातील दोन जण हे पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथे छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते. या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघा जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देण्यात आली आहे, दोघेही प्रशिक्षित आहे. या सर्वांना कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.




  Print






News - World | Posted : 2021-09-14






Related Photos