महत्वाच्या बातम्या

 खरीप हंगाम २०२६-२७ साठी धान भरडाईकरिता संमतीपत्र आमंत्रित


- १४ नोव्हेंबरपर्यंत बंद लिफाफ्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : खरीप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची वाहतूक, भरडाई आणि कच्चा तांदूळ (CMR) शासननिर्देशित गोदामात जमा करण्यासाठी इच्छुक नोंदणीकृत राईस मिलधारकांकडून बंद लिफाफ्यात संमतीपत्रे (ऑफर्स) मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित यांच्या संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, केंद्र शासनाने धानाची भरडाई करून केंद्रीय साठ्यासाठी कच्चा तांदूळ जमा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार निर्धारित वाहतूक व भरडाई दराने काम करण्यास इच्छुक असलेल्या नोंदणीकृत राईस मिलधारकांनी विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून संमतीपत्र सादर करायचे आहे.

धान भरडाईची संपूर्ण प्रक्रिया शासन निर्णयातील अटी, शर्ती आणि निकषांनुसार राबविण्यात येईल. भरडाईसंबंधी आवश्यक माहिती व तपशील बीईएएम पोर्टलवर विहित नमुन्यात ऑनलाइन अपलोड करून केंद्र शासनाच्या CFPP पोर्टलशी संलग्न करणेही आवश्यक राहणार आहे.

धानाची वाहतूक, भरडाई, तांदूळ तयार करणे आणि शासननिर्देशित गोदामात जमा करणे या कामांसाठी संबंधित गिरणीधारकांनी निर्धारित नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र नोंदणीकृत राईस मिलधारकांनी विहित कालमर्यादेत संबंधित कार्यालयात संमतीपत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, अहेरी येथे संपर्क साधावा.





  Print






Related Photos