महत्वाच्या बातम्या

 कढोली येथे रक्तदान शिबिर : १४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग


- सेवा संकल्प अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कढोली : भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा तथा बाल गणेशोत्सव मंडळ कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने कढोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे तसेच भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कृष्णाजी गजबे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, रक्तदान हे केवळ दान नसून गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. युवकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनीही युवकांनी रक्तदानासाठी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. या रक्तदान शिबिरात आकाश मेश्राम, शुभम दडमल, युवक भोयर, मनोज मानकर, राहुल नन्नावरे, विनायक जनबंधू, अनिकेत नन्नावरे, अभय मानकर, स्वप्निल सिताराम, विश्राम भूषण दुमाने, निखिल रामदास मानकर, सौरभ टेकाम, अनिकेत राऊत व अभिषेक सोनबावणे आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी चंद्रकांत चौके, ईश्वर चौधरी, जयंत निंबेकर, विजय नाकाडे, रोहित आखरे, सेवा सहारे, अजित ढवळे तसेच बाल गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बाल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल नन्नावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, मनोज मानकर, युवक भोयर, प्रशांत मानकर, गोलू जनमल, नामदेव नन्नावरे, कृष्णा नेवारे, संजय नन्नावरे, शेषराव गरमाडे, बंडू धारणे, युवराज वपरे, छगन टेकाम, रवी कोल्हे, मधुकर वाडगुरे, पंढरी उंब्रज नन्नावरे, विजय नन्नावरे, देवानंद निवारे, शुभम दडमल, कुलदीप दडमल, हार्दिक नन्नावरे, मंगेश टेकाम, कृष्णा शेंडे, अहमद पठाण, गोलू निवारे तसेच रक्त संक्रमण टीमचे गणेश साळवे, धीरज खेवले, राजकुमार भगत व बंडू कुंभारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमातून सेवा हीच संघटनाची ओळख हा संदेश देत भारतीय जनता पार्टी आणि बाल गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रमातून जनसेवेचा संदेश दिला.





  Print






Related Photos