महत्वाच्या बातम्या

 राजुरात भरदिवसा गोळीबार : विनोद उर्फ पापा जाधव यांची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी विनोद उर्फ पापा जाधव याच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील मुख्य मार्गावर प्रदीप बिअर बारच्या बाजूला असलेल्या नारळाच्या दुकानाजवळ ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना नागरिकांनी तातडीने उचलून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे दोन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या गोळीबारामुळे राजुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





  Print






Related Photos