गावभेट अभियानांतर्गत तहसिलदारांची आनंदवाडी ग्राम पंचायतीला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नागरिकांच्या दैनंदिन व पायाभुत सुविधांबाबत तक्रारींचे स्थानिक स्तरावर वर्गीकरण, उपाययोजना व कायदेशिर दृष्टीकोणातून जलद निवारण करण्यासाठी, शासकीय योजना व सार्वजनिक सेवांची प्रत्यक्ष पडताळणी तसेच स्थानिक संस्थांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने गावभेट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत येथे तहसिलदार एश्वर्या गिरी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
गावभेट दरम्यान नायब तहसिलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार एश्वर्या गिरी यांनी नागरीकांशी संवाद साधून गावातील पायाभूत सेवा व सुविधा (वीज, रस्ते, पाणी इत्यादी) बाबत समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच गावातील प्राथमिक शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अंगणवाडी तपासणी करण्यात आली तसेच ई- पिक पाहणी करण्यात आली, भटक्या विमुक्त जाती यांचा सर्वे करण्याच्या सुचना देण्यात आल्या, तसेच अतिक्रमीत पांदण रस्त्याची पाहणी करून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरीकांच्या इतर विभागाशी असलेल्या अडचणींबाबत संबंधित विभागाशी संपर्क करून समस्येचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या, असल्याचे तहसिल कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.




Petrol Price




