पर्लकोटाच्या पुरात एसडीआरएफच्या मदतीने दोन गंभीर रुग्णांना उपचारासाठी हलविले


- पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा संपर्क तुटला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीत भामरागड येथील दोन गंभीर रुग्णांना आज राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाच्या मदतीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
एसडीआरएफच्या पथकाने दोन्ही रुग्णांना बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे सुरक्षित पोहोचविले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील ६३ गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना नदीपलीकडे सुरक्षित पोहोचवून उपचारासाठी रवाना करण्यात एसडीआरएफच्या पथकाने मदत केली.




Petrol Price




