महत्वाच्या बातम्या

 गणेशोत्सव निमित्त गडचिरोलीत २२ सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार,२२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृतीचे जतन आणि स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात गणेश नृत्य, समूह नृत्य, भक्तीगीत आदी विविध कलाप्रकार सादर करण्यात येणार आहेत. कला, संस्कृती, श्रद्धा आणि एकात्मतेचा संगम असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





  Print






Related Photos