महत्वाच्या बातम्या

 चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात आरोपी एलसीबीचा ताब्यात : ७० हजारांची बजाज पल्सर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी शासकीय दूध डेअरी परिसरात करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत शुभम बिरन जाधव १८ वर्ष रा. इंदिरानगर, रेल्वे पटरीजवळ, चंद्रपूर हा चोरीचे वाहन विक्रीसाठी घेऊन शासकीय दूध डेअरी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून शुभम जाधव याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याच्याकडून ऑरेंज रंगाची बजाज पल्सर एनएस १२५ मोटारसायकल (क्रमांक एमएच २६ सीटी ०७६०) आढळून आली. सदर दुचाकी सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा येथील पोस्टमास्तर खजूर सोनकांबळे यांच्या मालकीची असून, ती मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथून चोरीस गेली होती. याप्रकरणी मुल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी मुल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुठ्ठावार तसेच पोलीस अंमलदार प्रतीक हेमके, विठ्ठल काकडे, प्रफुल पुप्पलवार आणि पोलीस शिपाई दिनेश अराडे यांनी केली.





  Print






Related Photos