महत्वाच्या बातम्या

 श्रीनगरात युवकाला मारहाण


- गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील श्रीनगर परिसरात युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वेदप्रकाश मुकुंदराव उपासाने ३५ वर्ष  रा. माताटोली, गोंदिया हे जखमी झाले असून, त्यांना ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता गंभीर अवस्थेत उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या उपासाने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून, मारहाणीचे नेमके कारण आणि घटनेमागील व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos