चंद्रपुरात मजुराची २० हजार रुपयांची लूट : रामनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील बसस्थानक परिसरात एका शेतमजुराकडून २० हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीएल ५६६० वरून पसार झालेल्या आरोपी शेख जुबेर शेख कादर ३४ वर्ष रा. रहमतनगर, चंद्रपूर व रोहित संदीप खडसे २४ वर्ष मूळ रा. तळेगाव, जि. वर्धा, सध्या चंद्रपूर या दोघांना रामनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून लुटीतील २० हजार रुपये रोख रक्कम, फिर्यादीच्या आधार कार्डाच्या झेरॉक्स प्रतीसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार, सावली तालुक्यातील करगाव येथील रहिवासी व शेतमजूर सुनील आनंदराव राऊत २७ वर्ष विदर्भ न्यूज एक्सप्रेस हे २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता तेलंगणाहून आपल्या गावी परतत असताना चंद्रपूर बसस्थानक परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या जवळ येऊन तुझ्या खिशात काय आहे, दाखव असे म्हणत जबरदस्तीने पँटच्या खिशात हात घालून प्लास्टिकच्या पिशवीतील २० हजार रुपये रोख रक्कम तसेच आधार कार्डाची झेरॉक्स प्रत हिसकावून घेतली.
फिर्यादीने आरोपींचा पाठलाग केला असता त्यांचे साथीदार दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीएल ५६६० घेऊन जवळच उभे होते. त्यावर बसून आरोपी घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. फिर्यादीने दिलेल्या वर्णनासह दुचाकी क्रमांकाच्या आधारे तीन स्वतंत्र पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात आली. आरोपींकडून लुटलेली ₹२० हजारांची रोख रक्कम, फिर्यादीच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीएल ५६६० जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, सफौ प्रकाश बलकी, पोहवा आंनद खरात, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, बाबा नैताम रविकुमार ढेंगळे, मपोहवा मनीषा मोरे, पोअं प्रकाश महावी, पंकज ठोंबरे, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, संदीप गेडाम, सुरज शेडमाके, मपोअं ब्ल्युटी साखरे यानी केले.
News - Chandrapur




Petrol Price




