चंद्रपूर जिल्यासाठी मुकेश भांदककर व अमोद गौरकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्यासाठी मुकेश रमेश भांदककर आणि अमोद विठ्ठलराव गौरकर यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या नियुक्तीमुळे जिल्यातील वन्यजीव संवर्धनाच्या कामाला अधिक बळ मिळणार आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, मानद वन्यजीव रक्षक वन्यजीव संरक्षण, अवैध शिकारीला आळा घालणे, वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे तसेच मानव-वन्यजीव संघर्षाशी संबंधित प्रकरणांमध्ये वन विभागाला सक्रिय सहकार्य करतील. स्थानिक पातळीवर वन्यजीव संरक्षणाशी निगडित उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन ते वन विभाग आणि नागरिक यांच्यात समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत.
वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे व्हावे, तसेच स्थानिक लोकसहभाग वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही नियुक्ती केली असून, चंद्रपूरसारख्या वनसमृद्ध जिल्ह्यात या मानद वन्यजीव रक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




