महत्वाच्या बातम्या

 विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : अंध महिलांच्या टी २० विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे सत्कार करण्यात आला.
भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसेच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त लोकभवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितु तावडे, एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू, संघाचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के., प्रशिक्षिका शिखा शेट्टी तसेच दिव्यांगांच्या शाळा व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काही दिवसांपूर्वी आपण देख ले इंडिया या महिला क्रिकेट संघाच्या प्रवासाच्या माहितीपटाचा ट्रेलर पाहिला. हा माहितीपट केवळ एखाद्या क्रिकेट संघाच्या विजयाची गाथा नसून तो दिव्यांग महिला खेळाडूंसमोरील सामाजिक - आर्थिक आव्हाने, त्यांच्यामध्ये दिसून येत असलेली कुटुंबाच्या जबाबदारीची भावना, समानतेसाठी त्यांचा लढा व परिश्रमपूर्वक मिळवलेल्या विजयाचे सजीव चित्रण आहे. त्यामुळे आपण माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित केले असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.   अंध महिला क्रिकेटपटूंनी केवळ विश्व चषक जिंकला नाही तर देशातील करोडो भारतीयांचे हृदय जिंकले असल्याचे त्यांनी सांगितले.

 





  Print






News - Mumbai




Related Photos