महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


- महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला विनम्र अभिवादन केला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. या दोन्ही महान विभूतींचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा अंगीकार करूनच आपण सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक घडवू शकतो.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष बोबाटे यांनी केले,





  Print






News - Gadchiroli




Related Photos