आजचे दिनविशेष


५ जुलै महत्वाच्या घटना
१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
१८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
१९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
१९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
१९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
१९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.
१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.
१९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
१९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
१९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
२००४: FRBM कायदा २००३ अमलात.
२०१७: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.State & Local Government
२००४: इंडोनेशिया या देशाची पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली.
२००३: SARS रोगराई उद्रेक - जागतिक आरोग्य संघटनेने हि रोगराई संपली असे घोषित केले.
१९९६: डॉली मेंढी - प्रौढ पेशीपासून क्लोन केलेला पहिला सस्तन प्राणी बनला.
१९९४: ऍमेझॉन या कंपनीची सुरवात.
१९७७: पाकिस्तान - देशामध्ये लष्करी उठाव.
१९७१: अमेरिकी - देशात मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले.
१९५०: कोरियन युद्ध - ओसानची लढाई: अमेरिकन आणि उत्तर कोरियाच्या सैन्यात प्रथम संघर्ष सुरु] झाला.
१९४३: दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई: ऑपरेशन सिटाडेल, जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनविरूद्ध मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू केले.
१९४१: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: जर्मन सैन्य नीपर नदी पर्यंत पोहोचले.
१९४०: दुसरे महायुद्ध - फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यामधील परकीय संबंध संपले.
१९१६: महर्षी कर्वें यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (SNDT Womens University), पुणे या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
५ जुलै जन्म
१८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)Time & Calendars
१९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
१९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)
१९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)
१९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.
१९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)
१९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
१९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.
१९६०: भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक राकेश झुनझुनवाला यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑगस्ट २०२२)
१९३३: भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक एस. के. भगवान यांचा जन्म (मृत्यू : २० फेब्रुवारी २०२३)
१९११: फ्रान्स देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष, बँकर आणि राजकारणी जॉर्जेस पोम्पीडो यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १९७४)
१८१०: अमेरिकन उद्योगपती आणि राजकारणी, द बर्नम आणि बेली सर्कसचे सहसंस्थापक पी. टी. बर्नम यांचा जन्म (मृत्यू : ७ एप्रिल १८९१)
५ जुलै मृत्यू
१८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१)
१८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)
१९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.
१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)
१९९६: रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
२००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)Time & Calendars
२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
२०२२: भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार विजेते पी. गोपीनाथन नायर यांचे निधन (जन्म: ७ जुलै १९२२)
१९९७: श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी ए. थंगाथुराई यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९३६)
१९६६: हंगेरियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज डी हेवेसी यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १८८५)
News - todayspecialdays




Petrol Price




