महाकाली पोलीस चौकीसमोर एफडीए ची धडक कारवाई: २४.४ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन एफडीए ने २९ जून २०२६ रोजी कारवाई करून २४.४ किलो विविध प्रकारचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २३ हजार ४४० रुपये असून या प्रकरणी एका युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाकाली पोलीस चौकीसमोर दुचाकी क्रं. एमएच ३४ बीवाय ४१४४ क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करून संपूर्ण साठा जप्त केला.
या कारवाईत तौफिक अब्दुल करीम त्यागी १९ वर्षे रा. फुले चौक, बाबुपेठ, ता. व जि. चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित साठा तसेच आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




