लॉईड्स मेटल्सच्या GET Night कार्यक्रमात नव्या अभियंत्यांचे स्वागत : RCERTच्या विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, युनिट-१ यांच्या वतीने आयोजित GET Night कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात ग्रँड आयकॉन हॉटेल, चंद्रपूर येथे पार पडला. या कार्यक्रमात २०२५ बॅचमधील ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी GET विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, तर २०२६ बॅचमधील नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्ट संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजी RCERT चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण करत नव्या व्यावसायिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. स्तुती साने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग–शैक्षणिक समन्वय अधिक मजबूत करणे आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंटसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय. जी. एस. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक मूल्ये आणि कार्यसंस्कृती याविषयी मार्गदर्शन केले. यशस्वी करिअरसाठी सातत्याने ज्ञान आत्मसात करत शिस्त, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि कामगिरीचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी आणि प्रगतीशील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
News - Chandrapur




Petrol Price




