महत्वाच्या बातम्या

 जबरी चोरीचा बादशहा पोलिसांच्या जाळ्यात : ९० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोंडपिपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा. राजुरा याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशीदरम्यान आरोपीने गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले दोन मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड जप्त केली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मूल) सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विनोद भुरले, मंगेष कराडे, सफौ.धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार, विलास कोवे, पोअं प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, सुशील गोंगले, आकाश गुंजकर तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos