ब्रह्मपुरी पोलिसांची दारू तस्करीवर कारवाई : कारसह रु.३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी पोलिसांनी अवैध मद्यतस्करीविरोधात प्रभावी कारवाई करत कारमधून १९२ बिअर कॅन जप्त केल्या असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २५-२६ जुलैच्या मध्यरात्री सुमारे २.३० वाजता गांगलवाडी-आरमोरी मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलिसांनी ब्रह्मपुरीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर नाकाबंदी केली असता पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर क्रं एमएच ३४ एएम ६७३० ही कार संशयाच्या आधारे थांबवून तिची झडती घेतली. झडतीदरम्यान कारमधून १९२ बिअर कॅन आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या बिअरची किंमत २५ हजार ९२० रुपये असून कारची अंदाजे किंमत रु.३ लाख आहे. पोलिसांनी एकूण ३ लाख २५ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील संदीप प्रदीप बंडी (वय ३८) व दीपक भास्कर जराते (वय १९) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद बनबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रत्न लेंगुरे व अमोल लोणबळे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद नैताम करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




