महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्र येथे पीएम किसान उत्सव दिवस संपन्न


- अल निनो संकट, पशुपालन आणि थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्र येथे  शनिवार २० जून २०३६ रोजी पीएम किसान उत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-Kisan) योजनेचा २३ वा हप्ता देशातील ९.४४ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) वितरित करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) कार्यक्रम सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाला सिंदेवाही आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम डॉ. विजय सिडाम विषय विशेषज्, कृषिविस्तार आणि डॉ. वर्षा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.

तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन -
डॉ. विजय सिडाम यांनी शेती वाचवा ही काळाची गरज असल्याचे सांगून शेतकऱ्यांना जागरूक केले. सध्या शेतीवर घोंगावणाऱ्या अल निनो या जागतिक हवामान बदलाच्या संकटावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. अल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, अनिश्चित पाऊस आणि वाढते तापमान यावर मात करून शेती कशी वाचवायची, यासाठी त्यांनी कमी पाण्याचे पिके घेणे, जलसंधारण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान यासारख्या विविध प्रभावी उपाययोजनांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 

डॉ. वर्षा जगदाळे  यानी शेतकऱ्यांना पशु आधारित शेती आणि पूरक व्यवसायावर मोलाचा सल्ला दिला. शेतीला पशुपालनाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे शाश्वत राहू शकते, हे त्यांनी पटवून दिले.यावेळी या कार्यक्रमाला सिंदेवाही आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos