महत्वाच्या बातम्या

 महिला लोकशाही दिन 20 जुलै रोजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : समस्याग्रस्त व पिडीत महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. 

त्याअनुषंगाने दिनांक २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांच्या तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावे. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. 

महिलांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे अर्ज, न्यायप्रविष्ठ, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न सोडविण्याचे दृष्टीने शासनाने एक व्यासपीठ निर्माण केले असुन महिला लोकशाही दिनाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos