महत्वाच्या बातम्या

 जंगलात सुरू होता पैशांचा जुगार : एलसीबीच्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरच्या पथकाने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलोधी खुर्द जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पाच आरोपी फरार झाले आहेत. सर्व १३ आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे  ११ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलोधी खुर्द जंगल शिवारात छापा टाकला. यावेळी काही जण पैशांचा डाव लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत जुगारासाठी वापरलेले साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली.

या कारवाईत ५२ पत्त्यांचा एक संच, डावावरील ४,४०० रुपये, आरोपींकडून अंगझडतीत मिळालेली ३८ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ७० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात आरोपी धनपाल घनशाम कार, जितेंद्र श्रीराम कुंभले, प्रवीण खेमराज दामले, सोमेश्वर पंढरी बघमारे, राकेश रमेश खेडकर, विलास किसन कुथे, वसंत सिताराम मातेरे आणि होमदेव मुखरु चाफले यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच आरोपी सुरज हारगुळे, रुपेश मिसार, अक्षय मेश्राम, सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos