भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील नागपूर–यवतमाळ वळण रस्त्यावर साटोडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मृत तरुणाचे नाव अभिजीत ऊर्फ छोटू सुरेंद्र उपाध्याय (वय २९, रा. स्टेशन फैल, वर्धा) असे आहे. तो आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच ३२-एजी ७२९८) नागपूर ते यवतमाळ वळण रस्त्याने साटोडा परिसरातून जात असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत उपाध्याय हे रस्त्याने प्रवास करत असताना मागून वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.
News - Wardha




Petrol Price




