महत्वाच्या बातम्या

  आजचे दिनविशेष


२७ मे महत्वाच्या घटना

१८८३ : अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.

१९०६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

१९३० : त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.

१९४१ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.

१९५१ : मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.

१९६४ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९९८ : ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

१९९९ : अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.

२०१६ : हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.

२०२२ : भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.

२७ मे जन्म

१९१३ : चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे २००४)

१९२३ : अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.

१९३८ : कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.

१९५७ : भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.

१९६२ : भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.

१९७५ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म.

१९७७ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म.

१९२८ : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचा जन्म (निधन: ३० ऑगस्ट २०१४)

२७ मे मृत्यू

१९१० : नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

१९१९ : भारतीय लेखक कंधुकुरी वीरेसालिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८)

१९३५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

१९६४ : भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)

१९८६ : संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.

१९८६ : भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)

१९९४ : विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९०१)

१९९८ : अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)

२००७ : हॉट एअर बलून चे निर्माते एड यॉस्ट यांचे निधन. (जन्म: ३० जून १९१९)

२०२१ : डेन्मार्क देशाचे ३७वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी पॉल श्लुटर यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १९२९)

२०१३ : भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचे निधन (जन्म: १० एप्रिल १९१७)

१९४२ : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक चेन डक्सिउ यांचे निधन (जन्म: ८ ऑक्टोबर १८७९)

१९२६ : भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचे निधन (जन्म: ८ सप्टेंबर १८४६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos