महत्वाच्या बातम्या

 विवाह मेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींनी योग्य जोडीदाराची निवड करावी : योगिता पिपरे


- संताजी भवन, गडचिरोली येथे सामूहिक वधू-वर परिचय मेळावा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा पवित्र बंध आहे. त्यामुळे योग्य विचार, शिक्षण, संस्कार आणि परस्पर विश्वास यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या मतांचा आदर करून समंजसपणे निर्णय घ्यावा. तसेच युवक-युवतींनी अशा विवाह मेळाव्याच्या माध्यमातून योग्य जोडीदाराची निवड करावी, असे प्रतिपादन योगिता पिपरे (जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका, न.प. गडचिरोली) यांनी केले.

गडचिरोली येथील संताजी भवन येथे आयोजित सामूहिक वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे (संचालक, महाराष्ट्र सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापती, न.प. गडचिरोली) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भैय्याजी सोमनकर, प्रकाशजी डांगे, हेमंजी मुरकुटे, पौर्णिमा सातपुते तसेच संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सातपुते उपस्थित होते.

या सामूहिक विवाह मेळाव्यास राज्यातील तसेच राज्याबाहेरील युवक-युवती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध समाजातील वधू-वरांचा परिचय सामूहिक पद्धतीने करून देण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उष्टुजी चलाक सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीजा सातपुते, यशवंत भांडेकर, द्रोणाक्ष सतपुते, विवेक सतपुते, अमोल कुकडकर, एम डी चालख, संदीप बोदलकर, गोपीचंद बोदलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या मेळाव्यासाठी सुमारे ५०० वधू-वरांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी १०० वधू-वर प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos