महत्वाच्या बातम्या

 अवैध जनावर वाहतुकीवर एलसीबीची मोठी धडक : १९.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : धाबा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गोवंशीय जनावर वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई करत दोन पिकअप वाहनांसह तब्बल २६ जनावरे जप्त केली. ही कारवाई मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा राजूरा–गडचांदूर पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन बोलेरो पिकअप वाहनांना अडवले. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेली २६ गोवंशीय जनावरे आढळून आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही पिकअप वाहने, २६ जनावरे व एक मोबाईल फोन असा एकूण अंदाजे १९ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात विश्वास प्रकाश मांडवगडे (२२) , रा. गोडपिपरी, रवि तोराम रा. लक्कडकोट ता राजुरा तसेच सहचालक कृष्णा ऊर्फ चिरकुट रा. बेबाळ ता. मुल, श्याम मडावी रा. लक्कडकोट ता राजुरा, समीर खान रा. राजूरा, आणि अज्जु शेख रा. कागजनगर, तेलंगणा यांचा समावेश असून सर्व आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सपोनि दीपक काक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोहवा किशोर वैरागडे, पो.अं. गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर तसेच उपपोस्टे धाबाचे ठाणेदार सपोनि धर्मेंद्र मडावी व पथकांनी केले.





  Print






News -




Related Photos