पंचायत समिती उमेद अंतर्गत सखींच्या मानधनात वाढ करा
- आमदार डॉक्टर देवराव होळी यांना आईसीआरपी च्या कृषी, पशु, मत्स्य, बँक व आर्थिक सखींचे निवेदन
- ऑफिस उपलब्ध करून देण्याची केली विनंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती उमेद अंतर्गत काम करणाऱ्या आय.सी.आर.पी. मधील कृषी सखी ,पशु सखी, मत्स्य सखी, बँक सखी, आर्थिक सखी यांचे मानधन केवळ २ हजार ५०० ते ३ हजार असल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता आमचे मानधन वाढवून देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन आमदार डॉक्टर देवराव होळी यांना या सखीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सखिंच्या वतीने शांती महेंद्र सिंग, उज्वला मिस्त्री, अमिता मिस्त्री, कमला मंडल, सुनीता हलदर, शेफाली सरकार, बासंती मिव्र यांनी निवेदन दिले.
यावेळी आमदार महोदयांनी आपल्या मानधन वाढीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असे आश्वासन या सखिना दिले.
News - Gadchiroli