महत्वाच्या बातम्या

 कोरेगावमध्ये सट्टापट्टी जुगार खेळवणारा पोलिसांच्या छाप्यात पकडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव परिसरात पोलिसांनी सट्टापट्टी जुगारावर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई ४ एप्रिल रोजी करण्यात आली. पोलीसांनी दिगंबर देवीदास गुड्डीमेश्राम या आरोपीला पानटपरीच्या बाजूला सट्टापट्टी जुगार खेळवताना पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा एकूण ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपनिरीक्षक कोमल माने यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos