शेजारच्या किरकोळ वादातून महिलेचा मृत्यू : नागपूरमध्ये धक्कादायक घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शहरातील न्यू येरखेडा परिसरात शेजाऱ्यांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. घरासमोरून जाण्याच्या मुद्द्यावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तीव्र शाब्दिक वादानंतर ४७ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२९) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित शेजारी दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मृत महिला त्रिशिला मुकेश खोब्रागडे (वय ४७, रा. साईकृपा सोसायटी) या आपल्या दोन मुलींसह राहत होत्या. त्यांचे पती मुकेश खोब्रागडे हे मध्य प्रदेशातील आमला येथे एअर फोर्समध्ये कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू येरखेडा येथे राहणाऱ्या सपना राहुल माटे (वय ४०) या नवीन कामठी पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती राहुल रंगारी हेही पोलीस विभागात कार्यरत आहेत. रविवारी रात्री सुमारे ८ वाजता सपना माटे घरी आल्यानंतर त्यांच्या आणि त्रिशिला खोब्रागडे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला.
त्रिशिला खोब्रागडे यांनी घरासमोर सिमेंटचा ओटा बांधल्यामुळे वाहन ये-जा करताना अडचण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला.
वादानंतर त्रिशिला खोब्रागडे या रात्री सुमारे ९ वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी संपूर्ण घटना सांगून सपना माटे व राहुल रंगारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री सुमारे १० वाजता त्रिशिला खोब्रागडे या घरी परतल्या. मात्र, घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. रक्तदाब वाढल्याने त्यांची स्थिती गंभीर झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कामठी-कळमना मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित शेजारी दाम्पत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिला त्रिशिला मुकेश खोब्रागडे (वय ४७, रा. साईकृपा सोसायटी) या आपल्या दोन मुलींसह राहत होत्या. त्यांचे पती मुकेश खोब्रागडे हे मध्य प्रदेशातील आमला येथे एअर फोर्समध्ये कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू येरखेडा येथे राहणाऱ्या सपना राहुल माटे (वय ४०) या नवीन कामठी पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती राहुल रंगारी हेही पोलीस विभागात कार्यरत आहेत. रविवारी रात्री सुमारे ८ वाजता सपना माटे घरी आल्यानंतर त्यांच्या आणि त्रिशिला खोब्रागडे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला.
त्रिशिला खोब्रागडे यांनी घरासमोर सिमेंटचा ओटा बांधल्यामुळे वाहन ये-जा करताना अडचण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. वादानंतर त्रिशिला खोब्रागडे या रात्री सुमारे ९ वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी संपूर्ण घटना सांगून सपना माटे व राहुल रंगारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर रात्री सुमारे १० वाजता त्रिशिला खोब्रागडे या घरी परतल्या. मात्र, घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. रक्तदाब वाढल्याने त्यांची स्थिती गंभीर झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कामठी-कळमना मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित शेजारी दाम्पत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
News - Nagpur




Petrol Price




