साकोली येथे दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की फोडून सोन्याची अंगठी चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील एकोडी रोड चौक परिसरात दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की फोडून सोन्याची अंगठी चोरीस गेल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्राम बामपेवाडा येथील तानबा काशीराम चांदेवार (वय ७०) यांनी BDCC Bank येथे गहाण ठेवलेली सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी त्याच दिवशी सोडवून घेतली होती. अंगठी त्यांनी एका बॅगेत ठेवून आपली स्कुटी (क्र. एमएच-३६-टी-९५५०) च्या डिक्कीत ठेवली.
यानंतर ते एकोडी रोड चौकातील Om Kirana येथे खरेदीसाठी गेले. काही वेळाने परत आल्यानंतर स्कुटीची डिक्की फोडलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून त्यातील बॅग पळवली. बॅगेत सोन्याची अंगठी असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
News - Bhandara




Petrol Price




